व्यास क्रिएशन्स्तर्फे तीन दिवसीय पुस्तक आदान प्रदान महोत्सव
ठाणे दि.१७ :- व्यास क्रिएशन्स्, राजी वुमन वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ ते २१ मे या कालावधीत ठाणे येथे पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष आहे.
पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी व्यास क्रिएशन्स् गेली १८ वर्ष सातत्याने नवनवीन उपक्रम आणि कार्यक्रम करते आहे. पुस्तक आदान प्रदान महोत्सव त्याच उपक्रमाचा एक भाग आहे.
‘जय जय स्वामी समर्थ मालिके’त स्वामीसुत पर्वाची सुरुवात – विकास पाटील साकारणार स्वामीसुत
सहयोग मंदिर हॉल, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प) येथे १९ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे.२० आणि २१ मे या दिवशी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत महोत्सव सुरू राहणार आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दुर्गाबाई भागवत यांच्यावरील लघुपटाचे सादरीकरण आणि व्याख्यान
महोत्सवात बाल साहित्यासह इतर अनेक साहित्य प्रकारातील तीसहून अधिक पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. यानिमित्त वाचकांना मान्यवर लेखकांशी संवाद साधता येणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटता येणार आहे.