करोना काळात बृहन्मुंबई महापालिकेने केलेले काम जगात अतुलनीय – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

मुंबई दि.१९ :- करोना काळामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी – अधिकाऱ्यांनी अथक आणि अविरत काम करून करोनाशी दिलेला लढा जगात अतुलनीय आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे केले. सुरेश काकाणी यांनी लिहिलेल्या ‘लढा मुंबईचा कोविडशी’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. लहाने बोलत होते.

सनातन संस्थेतर्फे रविवारी दादर येथे हिंदू एकता दिंडी’चे आयोजन

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात स्वच्छता कामगार, ‘आशा’ सेविका, वॉर्ड बॉय, नर्स आणि डॉक्टर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे लेखक काकाणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉक्टर नीलम अंद्रादे, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी, बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

बृहन्मुंबई महापालिका प्रभाग संख्येच्या वादावर सर्वोच्च न्यायालय आता ऑगस्टमध्ये सुनावणी

कार्यक्रमादरम्यान डॉ. मृण्मयी भजक यांनी काकाणी यांची प्रकट मुलाखत घेतली. ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन डॉक्टर मृण्मयी भजक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.