सनातन संस्थेतर्फे रविवारी दादर येथे हिंदू एकता दिंडी’चे आयोजन

मुंबई दि.१९ :- सनातन संस्‍थे’चे संस्‍थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्‍या ८१ व्‍या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्‍थेतर्फे ‘हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान’ राबविण्‍यात येत आहे. या अभियानाअंतर्गत येत्या २१ मे रोजी दादर येथे हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सेवा मंडळ चौक, कबूतरखान्याजवळ, दादर (प.) येथून ‘संध्याकाळी पाच वाजता दिंडीला सुरूवात होणार असून शिवाजी पार्कजवळ दिंडीचा समारोप होणार आहे.

‘आरपीआय’ आठवले गटाचे शिर्डी येथे राज्य महाअधिवेशन

मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, सामाजिक संघटना, संप्रदाय, समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी होणार आहेत. हिंदु राष्‍ट्र जागृती अभियानाच्याअंतर्गत गेले एक महिना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह देशभरात ठिकठिकाणी मंदिर स्‍वच्‍छता, हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधना प्रवचनांचे आयोजन करणेअसे उपक्रम राबविण्‍यात येत आहेत.

विधी शाखेच्या चौथ्या सत्राची परीक्षा १२ ते २० जून २०२३ या कालावधीत

हिंदू एकता दिंडीत सहभागी होणारे हिंदू पारंपारिक वेशभूषा परिधान करून नामजप करत, तसेच काही जण भजने म्‍हणत वारकरी परंपरेचे दर्शन घडवणार आहेत. राष्‍ट्रपुरूष, क्रांतीकारक, पराक्रमी हिंदु राजे यांच्या महान कार्याविषयीचे प्रबोधनही या फेरीत केले जाणार आहे.
हिंदू एकता दिंडी विषयी अधिक माहितीसाठी 9821015619 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सनातन संस्‍थेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.