ठळक बातम्या

गणेशोत्सव मंडळांसाठी ‘एक खिडकी’ सुविधा – १ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज

मुंबई दि.२६ :- बृहन्मुंबई महापालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी येत्या १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

पत्रकार सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल होणार

या सुविधेमुळे गणेशोत्सव मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही. महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. मंडप परवानगी नि:शुल्क देण्यात येणार आहे.

राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

तथापि, एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच यावर्षीदेखील श्री गणेश मंडळांना अर्जासोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *