चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करण्यात येणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि.१७ :- महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळात चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक काल मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा स्मृती पुरस्कार जाहीर

त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शक तसेच सिनेमागृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. निश्चित कार्यप्रणाली करण्यामागे सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृहविभागासह विविध विभागांचा समन्वय आवश्यक असणार आहे.

कोयनानगर येथे महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागा

येत्या पंधरा दिवसांमध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपली निवेदने सादर करावी. याविषयावर येत्या १५ जूननंतर होणा-या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. आज अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना याबाबतही काही नियमावली तयार करता येईल का? याबाबतही अभ्यास करण्यात यावा अशी सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.