‘आरपीआय’ आठवले गटाचे शिर्डी येथे राज्य महाअधिवेशन
मुंबई दि.१९ :- भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राज्य अधिवेशन येत्या २८ मे रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आज पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी दिली.
विधी शाखेच्या चौथ्या सत्राची परीक्षा १२ ते २० जून २०२३ या कालावधीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील इत्यादी मान्यवर अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
बृहन्मुंबई महापालिका प्रभाग संख्येच्या वादावर सर्वोच्च न्यायालय आता ऑगस्टमध्ये सुनावणी
महाराष्ट्रातील पश्चिम आणि पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे येथील पक्ष कार्यकर्ते अधिवेशनास येणार आहे. अधिवेशात दलित, आदिवासी , झोपडपट्टीवासी, मराठा , शेतकरी, कामगार आदी सर्व वर्गांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.