ठळक बातम्या

विधी शाखेच्या चौथ्या सत्राची परीक्षा १२ ते २० जून २०२३ या कालावधीत

मुंबई दि.१९ :- मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) चौथ्या सत्राची परीक्षा १२ ते २० जून २०२३ या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे सुधारित सविस्तर वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत ही परीक्षा होणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका प्रभाग संख्येच्या वादावर सर्वोच्च न्यायालय आता ऑगस्टमध्ये सुनावणी

एटीकेटी व नियमित परीक्षेच्या तारखा समांतर असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) ६ जूनपासून सुरू होणारी चौथ्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला होता. विद्यार्थ्यांसह शिंदे गटाच्या युवा सेनेनेही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *