मनोरंजन

ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत आणि उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट

मुंबई दि.१८ :- प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी शनिवारी दुपारी ‘मातोश्री’वर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान ही सदिच्छा भेट होती, असे ठाकरे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात फूट पाडल्यानंतर बहुसंख्य आमदार, खासदार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.‌

ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत आणि उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट

आगामी महापालिका निवडणुकीत दाक्षिणात्य मतदारांची साथ मिळविण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जाते. आदित्य ठाकरे यांनी अलिकडेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *