सावरकर स्मारकात रविवारी ‘शतजन्म शोधिताना’
मुंबई दि.२५ :- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई उत्कर्ष मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त येत्या २८ मे रोजी दादर येथे ‘शतजन्म शोधिताना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्र सैनिकी विद्यालय स्कूल, मुरबाड यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चा रविवारी समारोप – सावरकर जयंतीनिमित्त दादर येथे भव्य पदयात्रा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अलौकिक काव्यप्रतिभा आणि त्यांचे कार्यकर्तृत्व कार्यक्रमातून उलगडण्यात आले आहे. २८ मे रोजी सकाळी दहा वाजता दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर; अतिदक्षता विभागात उपचार सुरू
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक- ९२२००७०३८६ येथे संपर्क साधावा. कार्यक्रम विनामूल्य असला तरी आधी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल
कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि निवेदन मंजिरी मराठे यांचे आहे. संगीत दिग्दर्शन वर्षा भावे, नृत्य दिग्दर्शन डॉ. रुपाली देसाई तर संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. .