जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल

ठाणे दि.२५ :- राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सुमारे ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एप्रिल २०२० मध्ये आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण झाली होती.

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा चौथा हप्ता जूनच्या वेतनाबरोबर

या मारहाणीप्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. ही मारहाण आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती.

शेतकऱ्यांना दर्जेदार बि- बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे- मुख्यमंत्री शिंदे

त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. दरम्यान, पोलिसांच्या तपासात त्रुटी असल्याचे आरोप करत करमुसे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात यापूर्वी तीन आरोपपत्र दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.