‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चा रविवारी समारोप – सावरकर जयंतीनिमित्त दादर येथे भव्य पदयात्रा

मुंबई दि.२५ :- महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चा रविवारी (२८ मे) समारोप होणार आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती असून त्यानिमित्त दादर येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

राज्याचा पर्यटन विभाग, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आदींसह मुंबई व लगतच्या महानगरांतील राष्ट्रीय विचारधारेच्या संस्था-संघटना, सांस्कृतिक-धार्मिक संस्था-संघटना, शैक्षणिक संस्था, नागरिक-कार्यकर्ते यांची उपस्थित राहणार आहेत.

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा चौथा हप्ता जूनच्या वेतनाबरोबर

रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता दादर पश्चिम येथील सावरकर सदन ते स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक अशी पदयात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात येणार आहे. ‘जयोस्तुते’ गीताच्या सामूहिक गायनाने पदयात्रेची सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.