मुंबई दि.२८ :- मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाच्या बेअरिंग दुरुस्तीचे काम रविवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यामुळे आता या पुलावरून अवजड वाहतूकही सुरु केली जाणार आहे.
साकेत खाडी पुलाचे बेअरिंग निसटल्याने पुलाच्या जोडणीच्या ठिकाणी हादरे बसत होते. २३ ऑगस्ट रोजी ही बाब समोर येताच पुलाच्या कामाला एमएसआरडीसीकडून सुरवात करण्यात आली.
पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार होता. मात्र अभियंत्यांचा चमू आणि अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने दुरुस्तीचे काम पूर्ण करून चार दिवसांतच पूल सुरू करण्यात आला.