ठळक बातम्या

‘रक्षाबंधनाच्या दिवशी स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता’

मुंबई दि.२८ :- रक्षाबंधनाच्या दिवशी हिंदु भगिनींना स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन काजल हिंदुस्थानी यांनी केले. हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘लव्ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण, हे खरे रक्षाबंधन’ या विषयावरील विशेष संवादात त्या बोलत होत्या. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
खाजगी इस्लामी संस्थाना ‘हलाल प्रमाणपत्रा’ची परवानगी देऊ नये – हिंदु जनजागृती समितीची मागणी
उच्चशिक्षित चांगल्या घरातील हिंदू मुली भंगार गोळा करणार्‍या, पंक्चरवाल्या मुसलमान युवकांसोबत पळून जातात. आज धर्मांधांना हिंदू युवतींना फसवून आणण्याचे प्रशिक्षण दिले जात असून त्यासाठी पैसा ओतला जात आहे. आज आपल्या मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नाही; मात्र मदरशांतून धर्मासह लढण्याचेही प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्या म्हणाल्या.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
आपल्याला अहिंसेचा अतिरेक करण्याचे बाळकडू देऊन तेजहिन करण्याचे कारस्थान सुरू आहे. विविध प्रकारच्या जिहादसाठी मौलानांना पैसा पुरवठा होत असून हिंदू धर्मीयांनी मंदिरांना दिलेला निधी सरकार पळवत आहे. हिंदू समाजाचे जेवढे नुकसान मोगल आणि ब्रिटीश यांनी केले नसेल, तेवढे काँग्रेसी, सेक्युलरवादी सरकारांसह कम्युनिस्ट इतिहासकार आणि ख्रिस्ती शिक्षणपद्धतीने केले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *