Skip to content
मुंबई दि.२८ :- मुंबई सेंट्रल-हापा दुरांतो एक्स्प्रेस, बनारस एक्स्प्रेस आणि जयपूर एक्स्प्रेसला अतिरिक्त द्वितीय श्रेणीचे आसन कोच जोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
ट्रेन क्रमांक १२२६७/१२२६८ मुंबई सेंट्रल-हापा दुरांतो एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवरून १ सप्टेंबरपासून आणि हापा येथून २ सप्टेंबरपासून अतिरिक्त द्वितीय श्रेणीच्या आसन कोचसह धावणार आहे.
ट्रेन क्रमांक २२९६९/२२९७० ओखा-बनारस एक्स्प्रेस ३१ ऑगस्टपासून ओखा येथून आणि २ सप्टेंबरपासून बनारस येथून अतिरिक्त द्वितीय श्रेणीच्या सीटिंग कोचसह धावेल.
ट्रेन क्रमांक १९५७३/१९५७४ ओखा-जयपूर एक्स्प्रेस ४ सप्टेंबरपासून ओखा आणि ५ सप्टेंबरपासून जयपूर येथून एका अतिरिक्त द्वितीय श्रेणीच्या बैठ्या कोचसह धावेल. तिन्ही ट्रेनचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू झाले आहे.