विक्रोळी आणि भांडुप भागातील डोंगर उतारावर दरड कोसळण्याचा धोका; रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन

मुंबई दि.२१ :- विक्रोळी आणि भांडुप भागातील डोंगर उतारावरील झोपड्पट्टी परिसरात पावसाळ्यात दरड कोसळण्याचा तसेच डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या लोंढ्यामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा धोका आहे. तरी या परिसरातील झोपडपट्टीवासीयांनी पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

नैऋत्य मान्सून अंदमानात दाखल

विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यनगर, पवई येथील इंदिरानगर, गौतमनगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर १ आणि २, नरदास नगर, गावदेवी टेकडी, गांवदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाउंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी आदी वस्त्या डोंगर उतारावर आहेत.

एकविरा देवी संदर्भात समाज माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, तसेच सुरक्षित स्थळी न जाता तेथेच वास्तव्यास राहणाऱ्या रहिवाशावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, जीवित किंवा वित्तहानी झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.