नैऋत्य मान्सून अंदमानात दाखल
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२१ :- नैऋत्य मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
एकविरा देवी संदर्भात समाज माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित
येत्या ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे. याआधी नैऋत्य मान्सून अंदमानात नेहमीपेक्षा उशिरा दाखल होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. २२ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.
नालेसफाईच्या कामाबाबत नागरिकांकडून अभिप्राय मागवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हा मान्सून केरळमध्ये ४ जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ९ ते १५ जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 9 ते 15 जून पर्यंत
https://youtu.be/u2fCTg84nDk