एकविरा देवी संदर्भात समाज माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित
शिवसेना महिला आघाडी तर्फे कारवाई ची मागणी
कार्ला येथील आई एकविरा देवी संदर्भात काही आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित केला गेला. या आक्षेपार्ह मजकुरा विरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तर्फे आज करण्यात आली. महिला आघाडी शिष्टमंडळातर्फे आज मानपाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले त्यात ही मागणी करण्यात आली.
नालेसफाईच्या कामाबाबत नागरिकांकडून अभिप्राय मागवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आगरी, कोळी, चांद्रसेनिय कायस्थ प्रभू (सी.के.पी),तसेच अन्य समाजाची एकविरा देवी श्रद्धास्थान आहे. या आक्षेपार्ह मजकुरा मुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या मजकुराची गंभीर दखल घेऊन संबंधित विरोधात कायदेशीर कारवाई करावी असे या निवेदनात म्हंटले आहे.
शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख इंदिरा अरुण भोईर, यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मानपाडा पोलिसांना देण्यात आले. शिष्टमंडळात विभाग प्रमुख नकुल गायकर, उपविभाग प्रमुख प्रफुल कासार, विराज भोईर, मनिषा पाटील, सारिका सावंत, जयश्री भोईर, दिलिप गायकर, मधु राय, आशा भोईर, मृणाल पाटील, अजय मधे, संतोष गरुड यांचा समावेश होता.
एकविरा देवी संदर्भात समाज माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित