हिंदू राष्ट्र जागृती अभियानाअंतर्गत हिंदू एकता दिंडीचे आयोजन
मुंबई दि.२२ :- सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या उपक्रमांतर्गत दादर येथे रविवारी हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयांतील एक हजारांहून अधिक हिंदू बांधव जात, प्रांत, भाषा, संघटना, संप्रदाय, पक्ष इत्यादी भेद बाजूला सारून दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा; पुढील सूनावणी ८ जून रोजी
दादर (प.) येथील कबूतरखान्याच्याजवळील ब्राह्मण सेवा मंडळ चौक येथून सुरु झालेल्या या हिंदू एकता दिंडीचा आरंभ शंखनाद आणि धर्मध्वजाच्या पूजनाने झाला. ‘हिंदू एकता दिंडी’ची सांगता शिवाजी पार्कजवळील चौकात झाली. यावेळी उपस्थित वक्त्यांनी हिंदूसंघटनाची आवश्यकता अधोरेखित करून एकत्रितपणे राष्ट्र आणि धर्मकार्य करण्याचे आवाहन केले.
सर्व क्रांतिकारकांचा योग्य गौरव होणे आवश्यक राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी परिषद, परशुराम तपोवन आश्रम (वसई), इस्कॉन, श्री योग वेदांत सेवा समिती, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, व्यापारी संघ-दादर, धर्मजागरण मंच, हिंदु गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था आणि इतर हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक संघटना, संप्रदाय आणि मंडळे यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.