सर्व क्रांतिकारकांचा योग्य गौरव होणे आवश्यक राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा
स्मृती पुरस्कार प्रदान
मुंबई दि.२२ :- देशाच्या इतिहासात क्रांतिकारक नेत्यांना बदनाम केले गेले, या इतिहासातील अन्यायाला सुधारून सर्व क्रांतिकारकांचा योग्य गौरव करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी रविवारी येथे केले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरित करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बैस बोलत होते.
‘हवामानपूरक प्रकल्पांची रचना’ या विषयावरील कार्यशाळेचा महापालिका मुख्यालयात समारोप
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर सह कार्यवाह स्वप्निल सावरकर हे ही उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजाचे शिल्पकार, समाजातील दोष दूर करणारे सुधारक, जातिभेदाविरोधात लढणारे योद्धे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणे हे तीर्थयात्रेस येणे आहे. २८ मे हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन म्हणून घोषित केला आहे तर त्याच दिवशी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या वास्तुचे उदघाटन होणार आहे, याचीही विशेष आठवण राज्यपाल बैस यांनी करून दिली.
विक्रोळी आणि भांडुप भागातील डोंगर उतारावर दरड कोसळण्याचा धोका; रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन
स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार – २०२३ मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (मरणोत्तर) यांना देण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या मातोश्री ज्योति प्रकाशकुमार राणे यांनी स्वीकारला. स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२३ आय. आय. टी. कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांना प्रदान करण्यात आला तर स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार – २०२३ पुरस्कार नागपूरच्या मैत्री परिवार या संस्थेला प्रदान करण्यात आला. संस्थेच्या प्राचार्य माधुरी यावलकर, प्रा. प्रमोद पेंडके यांनी पुरस्कार स्वीकारला.
एकविरा देवी संदर्भात समाज माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित
सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी असणारा व्यक्ती वा संस्थेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार रत्नागिरी येथील अधिवक्ता (वकील) प्रदीप (बाबा) चंद्रकांत परुळेकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी तर सूत्रसंचालन श्रीराम केळकर यांनी केले. स्मारकाचे अध्यक्ष, राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आभार मानले.