समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा; पुढील सूनावणी ८ जून रोजी

मुंबई दि.२२ :- लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेल्या समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत वानखेडे यांना न्यायालयाने हा दिलासा दिला.

बृहन्मुंबई महापालिकेसाठी भाजपचे ‘लक्ष्य १५०’

आता या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या ८ जूनला होणार आहे. ‘एनसीबी’चे माजी संचालक वानखेडे यांच्यावर ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला असून याविरोधात वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

‘हवामानपूरक प्रकल्पांची रचना’ या विषयावरील कार्यशाळेचा महापालिका मुख्यालयात समारोप

या प्रकरणाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध करून देऊ नये. अन्यथा सीबीआयने कारवाई करावी, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तर तपासात सहकार्य केले जाईल आणि तपासाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध करून देणार नाही, अशी हमी वानखेडे यांनी न्यायालयात दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.