ठाणे दि.१६ :- राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येत्या ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा आणि सर्व तालुका न्यायालये, तसेच कौटुंबिक, कामगार, सहकार, न्यायालये, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, शाळा न्यायाधिकरण आदी ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता ही लोकअदालत भरणार आहे.