Skip to content
मुंबई दि.१६ :- गृहप्रकल्पांच्या ग्राहकांच्या असलेल्या तक्रारीबाबत विकासकांनी तक्रार निवारण कक्ष उभारावा, असे आवाहन महारेराने केले आहे. गृहप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भातील काही तक्रारी असतील तर नेमका कोणाशी संपर्क साधावा याची काहीच माहिती ग्राहकांना नसते. त्यामुळे अशा प्रकारचा कक्ष उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या तक्रार निवारण कक्षात किमान एक अधिकारी नेमण्यात यावा, कक्ष स्थापन करताना तिथे काम करणा-या तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक याची माहिती प्रकल्पाच्या ठिकाणी आणि संकेतस्थळावर ठळकपणे देण्यात यावी, ग्राहकांकडून आलेल्या तक्रारी, त्यांचे निवारण याची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही महारेराने केल्या आहेत.