ठळक बातम्या

संत तुकाराम महाराज यांचें अभंग आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि.१६ :- संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेले अभंग आजच्या आधुनिक युगातही समर्पक, व्यवहार्य, मार्गदर्शक आहेत. त्यांनी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते ‘अभंग एकविशी’ पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येत्या ९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत
‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते त्यांच्या देवगिरी निवासस्थानी झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
गृहप्रकल्पांच्या तक्रारीबाबत विकासकांनी तक्रार निवारण कक्ष उभारावा – महारेराचे आवाहन
जगतगुरु संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांनी लिहिलेल्या अभंगाना व्यावहारिकतेची जोड होती. सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार त्यांनी मांडले, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नायर दंत रूग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *