राज्यपालांच्या हस्ते देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी

माध्यमांची भूमिका महत्वाची- राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि.०३ :- देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. विश्व संवाद केंद्र मुंबईच्या वतीने देण्यात येणारे २२ वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते बुधवारी राजभवन येथे समारंभपूर्वक देण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बैस बोलत होते.

रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाज माध्यम क्षेत्रातील १० पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा व्हिडीओ ब्लॉगर्स आणि खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र सध्याच्या युगात खोट्या आणि अनुचित बातम्या तसेच अयोग्य कन्टेन्ट दाखवण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याचे सांगून राज्यपाल बैस म्हणाले, अशा खोट्या अपप्रचाराचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्वाची आहे.

श्रावण हर्डीकर यांची बृहन्मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती

आज माध्यम बाहुल्याच्या युगात देखील मुद्रित माध्यमांचे स्वतःचे असे वेगळे महत्व आहे, त्यामुळे मुद्रित माध्यमे संपणार नाहीत, असेही राज्यपालांनी सांगितले. रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण उर्फ प्रमोद कोनकर. दैनिक सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर, वृत्त निवेदक दीपक पळसुले, टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे, निलेश खरे, जयंती वागधरे, यूट्यूबर अनय जोगळेकर, लेखक अंशुल पांडे व समाज माध्यम क्षेत्रातील निनाद पाटील व हृषिकेश मगर यांना पुरस्कार देण्यात आले.

सुंदर मोडी मोडी हस्ताक्षर आणि मोडी लिप्यंतर स्पर्धा संपन्न

विश्व संवाद केंद्राने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून आजवर ७४ पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. विश्वस्त निशिथ भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. अनय जोगळेकर व प्रवीण टोकेकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोब्बी शोशानी तसेच माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.