सुंदर मोडी मोडी हस्ताक्षर आणि मोडी लिप्यंतर स्पर्धा संपन्न

मुंबई, दि.०३ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि शिवराज्याभिषेक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा तसेच मोडी लिप्यंतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ८० स्पर्धक सहभागी झाले होते. मोडी लिपिच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे.

रे रोड येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी तांत्रिक दुरूस्तीच्या कामासाठी तात्पुरती बंद

‘मोडी लिपी स्पर्धे’निमित्ताने प्रशिक्षक सुनील कदम म्हणाले, ‘मोडी लिपी साडेसातशे वर्षांपूर्वीची आहे. हेमाद्री पंडित यांनी ती प्रचलित केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो काही पत्रव्यवहार केला गेला. लेखन व्यवहाराची जी लिपी होती, ती राजलिपी ही मोडी लिपी होती. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई आणि इंग्रजांच्या काळातला काही काळ साधारण १९५२ पर्यंत जे काही सरकारी आणि खासगी कागदोपत्री व्यवहार झाले ते मोडी लिपीत लिहिले जात होते.

राज्यात वन्यजीव व्यवस्थापनाचे काम अभिनंदनीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करावयचा असेल, तर तुम्हाला ही कागदपत्रे वाचावी लागतात, पण त्याकरता मोडी येणे गरजेचे असते. आता मोडी विस्मृतीमध्ये गेली आहे. यासाठी तिचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे हे महत्त्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ‘मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली म्हणजे मोडी लिपी’ असे म्हणता येईल.’

Leave a Reply

Your email address will not be published.