रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय
मुंबई दि.०३ :- राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्याकरता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.
श्रावण हर्डीकर यांची बृहन्मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती
मुंबईत ४०० किलोमीटरच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. तर, अनेक ठिकाणीही कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांवर देखरेख ठेवण्याकरता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यास मदत होणार असून महाडमंळाच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुंदर मोडी मोडी हस्ताक्षर आणि मोडी लिप्यंतर स्पर्धा संपन्न
कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, दरवर्षी २५ मुला-मुलींना शिष्यवृत्ती, घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प, शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय, करमणूक शुल्क आकारणीमध्ये सवलत आदि निर्णयही यावेळी घेण्यात आले.