मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेची अभय योजना – मालमत्ता कराची सुमारे अठराशे कोटीची थकबाकी

कल्याण दि.२० :- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत या योजनेची अंमलबजाणी केली जाणार आहे. चालू कर, यापूर्वीचा दंड आणि व्याज अशी एकत्रित रक्कम करदात्याने भरल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

चतुरंग प्रतिष्ठानच्या चैत्रपालवी संगीतोत्सवात संगीत सन्मान, संगीत शिष्यवृत्ती प्रदान

करदात्याने संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराच्या मागणीची दंड, व्याजासहची २५ टक्के रक्कम एक रकमी भरल्यास त्याला ७५ टक्के शास्ती रक्कम माफ केली जाणार आहे. १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत हा कर भरणा करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मागील अनेक वर्षाची मालमत्ता कराची सुमारे अठराशे कोटीची रक्कम थकबाकीदारांकडे आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याची प्रक्रिया २३ मेपासून सुरू – नोटा जमा करण्याची शेवटची तारीख..

वाणीज्य कराची सर्वाधिक थकबाकी आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट, कौटुंबिक वादात अडकली आहेत. प्रशासनाला कर वसुली करताना अडथळा येतो. अभय योजनेतून सुमारे २०० ते २५० कोटीचा महसूल मिळेल, असा विश्वास आयुक्त दांगडे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.