दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याची प्रक्रिया २३ मेपासून सुरू – नोटा जमा करण्याची शेवटची तारीख..

मुंबई दि.२० :- रिझर्व्ह बँकेच्या ‘स्वच्छ नोट धोरणा’च्या अनुषंगाने, २००० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये १,००० रुपये आणि ५०० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद करत २,००० रुपये मूल्याची नवीन नोट चलनात आणली होती. ज्या नागरिकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी त्या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करायच्या आहेत. रिझर्व्ह बँकेने याबाबत बॅकांना सूचना दिली असून नोटाबदलाची प्रक्रिया मंगळवार, २३ मेपासून सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक शाखांमध्येही नोटाबदलाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

सुशासन नियमावलीस’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता – फायलींचा प्रवास फक्त चार स्तरांवर

नागरिकांना कोणत्याही बँकेच्या शाखेतून एकावेळी केवळ २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. ‘केवायसी’ पूर्तता असणारे बँक खातेधारक कितीही रकमेपर्यंत नोटाबदल करू शकतील. बँकांकडून ग्रामीण व दुर्गम भागांत नियुक्त व्यापार प्रतिनिधींकडून (बीसी) नोटाबदल शक्य असून, ते दिवसाला प्रत्येक खातेदाराला कमाल ४,००० रुपये मूल्याच्या दोन नोटा बदलून देऊ शकतील.

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्यापासून दहा प्रभाग क्षेत्रात कचरा संकलन केंद्रे

कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन दोन हजारांची नोट बदलून इतर कमी मूल्याच्या नोटा मिळवता येतील. त्यासाठी त्याच बँकेत खाते असणे आवश्यक नाही. मात्र, अशावेळी केवळ २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. कोणत्याही बँक शाखेतून दोन हजार रुपयांची नोट बदलून इतर लहान मूल्याचे चलन मिळविण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नोटा बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.