चतुरंग प्रतिष्ठानच्या चैत्रपालवी संगीतोत्सवात संगीत सन्मान, संगीत शिष्यवृत्ती प्रदान
डोंबिवली दि.२० :- चतुरंग प्रतिष्ठानच्या ४९ व्या वर्धापनदिनानिमित्त चैत्रपालवी संगीतोत्सव कार्यक्रमाचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले होते. सुयोग मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार पं. नित्यानंद हळदीपूर यांना तर चतुरंग संगीत शिष्यवृत्ती पुरस्कार युवा गायिका सावनी गोगटे यांना प्रदान आला.
पं. हळदीपूरकर यांना ७५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, गायिका सावनी हिला २५ हजार रुपये आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्राजक्ता काकतकर यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांना अभिजित काकतकर यांनी तबल्याची, श्रेयस गोवित्रीकर यांनी पेटीची साथ दिली.
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्यापासून दहा प्रभाग क्षेत्रात कचरा संकलन केंद्रे
चिराग कट्टी यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम यावेळी झाला. त्यांना रोहित देव यांनी तबला साथ दिली. यावेळी म्हैसकर फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर, ज्येष्ठ पत्रकार डाॅ. उदय निरगुडकर, निवड समिती सदस्य ज्येष्ठ गायिका शुभदा पावगी, पंडित चंद्रशेखर वझे, प्रवीण करकरे उपस्थित होते.