ठाणे, वसई खाडी आणि उल्हास नदी जोडून मुंबई, वसई, ठाणे, कल्याण जलवाहतूक सुरू करणार
प्रकल्पासाठी ४२४ कोटी रुपयांची तरतूद
मुंबई दि.१६ :- महाराष्ट्र सागरी मंडळाने ठाणे खाडी, वसई खाडी आणि उल्हास नदी एकमेकांना जोडून मुंबई, वसई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई अशी वर्तुळाकार जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी संप बेकायदेशीर, उच्च न्यायालयात याचिका दाखल
यासाठी ४२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत वसई – ठाणे – कल्याण असा ५० किलोमीटर जलमार्ग विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत दहा जेट्टी बांधण्यात येणार असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चार जेट्टींची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
