राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी संप बेकायदेशीर, उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई दि.१६ :- जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील १७ लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर असल्याचे मत विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते फ्री प्रेस हाऊस दरम्यान उद्यापासून वातानुकूलित बससेवा
आज या संपाचा तिसरा दिवस असून संपामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात. मात्र, त्यांनी पुरकारलेला संप बेकायदेशीर आहे. याप्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
