किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडून परराज्यातून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांवर लक्ष ठेवा – अन्न आणि औषध प्रशासनाचे आदेश
मुंबई दि.२३ :- बनावट औषधांना आळा आणि उत्तम व चांगल्या दर्जाची औषधे मिळावीत यासाठी किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडून परराज्यातून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांवर लक्ष ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
अन्यथा मुंबईतील खासगी तसेच शासकीय बांधकामे थांबविण्यात येतील – महापालिका आयुक्त चहल
राज्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेते मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषध खरेदी करतात. यामुळे बनावट औषधे मिळण्याची शक्यता असू शकते. याचा विचार करून वरील आदेश देण्यात आल आहे.
आमदार अपात्रता प्रकरण; ३४ याचिकांची सहा गटांमध्ये विभागणी करून पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला
परराज्यातून येणारा औषधांचा तपशील जतन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्हा कार्यालय व विभागीय कार्यालयाने स्वंतत्ररित्या ईमेल आयडी तयार करावे , असे सांगण्यात आले आहे. प्रमाणात परराज्यातून खरेदी करणारे औषध विक्रेत्यांच्या आवश्यकतेनुसार तपासण्या करण्यात याव्यात व अनियमितता आढळून आल्यास कारवाई घेण्यात यावी. या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक कार्यालयाने विभागीय कार्यालयामार्फत मुख्यालयास सादर करावेत, असा आदेश देण्यात आला आहे.