राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अंध महिलांना स्वयंरोजगार संचाचे वितरण
मुंबई दि.२३ :- राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेतील दृष्टिबाधित महिलांना ‘स्वयं – रोजगार संचाचे’चे वितरण करण्यात आले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते ‘नॅब’ला मदत करणा-या दानशूर व सेवाभावी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
‘नॅब’चे अध्यक्ष हेमंत टकले यांनी संस्थेच्या कार्याची तर मानद सचिव डॉ विमलकुमार डेंगला यांनी नॅब संस्थेतील ब्रेल पुस्तकांच्या निर्मितीची माहिती दिली. नॅबच्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम यांनी प्रास्ताविक केले तर मानद सचिव हरेंद्रकुमार मलिक यांनी आभार मानले.