मुंबईत उद्या शिवसेना आणि उबाठा गटाचा दसरा मेळावा – दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी
मुंबई दि.२३ :- शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही गटांचे वेगवेगळे दसरा मेळावे सलग दुसऱ्या वर्षीही उद्या (मंगळवार) मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. उबाठा गटाचा मेळावा दादरला शिवाजी उद्यान येथे तर शिवसेनेचा मेळावा बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानावर होणार आहे.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अंध महिलांना स्वयंरोजगार संचाचे वितरण
गेल्या वर्षी दसऱ्या मेळावा शिवाजी उद्यान मैदानावरच घेण्यासाठी दोन्ही गटात वाद झाला होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दसरा मेळाव्यासाठी उबाठा गटाला शिवाजी उद्यान मैदान देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेचा मेळावा वांद्रे येथील वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर घ्यावा लागला होता. या दोन्ही मेळाव्यांसाठी राज्यभरातील दोन ते अडीच लाख शिवसैनिक मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे.
हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
राज्यातील दुष्काळ, बेरोजगारी, हिंदूत्व, मराठा आरक्षण,परदेश दौरे, भ्रष्टाचार या विषयांवर उद्धव ठाकरे बोलतील तर केंद्र व राज्य सरकारची कामगिरी, पूर्ण केलेले प्रकल्प, योजना, दुष्काळावरील उपाययोजना याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहिती देतील, असे सांगितले जाते. उबाठा गटात आणखी फूट पडून अन्य नेते, आमदार शिवसेनेत प्रवेश करतात का? याकडेही लक्ष लागले आहे.