रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक
मुंबई दि.२५ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवरवर सोमवारपासून १५ डब्यांच्या सहा नवीन लोकल फेऱ्या
परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. bतसेच वाशी, बेलापूर पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. मेगाब्लॉक वेळेत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बरवरील फेऱ्या नियमित सुरू राहणार आहेत.
Dwadi Roda ; पाणीप्रश्नी नागरिक व महिलांची एमआयडीसी कार्यालयात धडक भेट
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते जोगेश्वरी रेल्वे स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाचव्या मार्गिकेवरील ब्लॉकमुळे २५ मार्च रोजी धावणारी अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस विरार स्थानकापर्यंत धावणार असून बोरिवली ते विरारदरम्यान ही गाडी रद्द राहणार आहे.
