पश्चिम रेल्वेवरवर सोमवारपासून १५ डब्यांच्या सहा नवीन लोकल फेऱ्या
मुंबई दि.२५ :- येत्या २७ मार्चपासून १५ डब्यांच्या सहा नवीन लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेकडून चालविण्यात येणार आहेत. विरार ते अंधेरी, नालासोपारा ते अंधेरी आणि विरार ते बोरिवलीदरम्यान या १५ डब्यांच्या लोकल धावणार आहेत.
Dwadi Roda ; पाणीप्रश्नी नागरिक व महिलांची एमआयडीसी कार्यालयात धडक भेट
अंधेरी ते विरारदरम्यान धावणाऱ्या १२ डब्यांच्या लोकलला तीन अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. सोमवारपासून १२ डब्यांच्या सहा लोकल फेऱ्या १५ डब्यांच्या म्हणून चालविण्यात येणार आहेत.
टँकरच्या पाण्यात होणा-या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल- उदय सामंत
सहा फेऱ्यापैकी दोन फेऱ्या जलद मार्गावर आहेत. यामुळे धीम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गावरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. वाढीव सहा फेऱ्यामुळे पश्चिम रेल्वेवरील १५ डब्बा लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या १४४ वरून १५० वर पोहचणार आहे.