Dwadi Roda ; पाणीप्रश्नी नागरिक व महिलांची एमआयडीसी कार्यालयात धडक भेट
डोंबिवलीतील दावडी रोड विभागात प्रचंड पाणीटंचाई जाणवत असून पाण्याच्या दुर्भिक्षामुळे येथील नागरिकांचे कमालीचे हाल होत आहेत सुमारे पाच हजार कुटुंबांना पाणी अभावी ऐन उन्हाळ्यात कष्ट सोसावे लागत असून या पाणीटंचाईला येथील नागरिक कमालीचे त्रासले आहेत सदर प्रश्न सुटावा यासाठी नागरिकांनी माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांना साकडे घातले.दरम्यान आज मंगळवार दिनांक 21 मार्च रोजी रमाकांत पाटील व या विभागातील नागरिक व महिलांनी एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात धडक भेट देत अधिकारी शेलार यांच्याकडे हा प्रश्न मांडला. हा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा प्रसंगी अधिकाऱ्यांनाही कार्यालयात बसून न देण्याचा इशारा यावेळी रमाकांत पाटील यांनी दिला.दरम्यान गुरुवारी या संदर्भात पुन्हा एका बैठकीच आयोजन करण्यात आलं असून हा प्रश्न सोडवण्यासाठी या बैठकीत उपाययोजना केली जाईल असं आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
