ठळक बातम्या

मंदिर सरकारीकरणासह अन्य प्रश्नांसंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र मंदिर महासंघा’तर्फे मागण्यांचे निवेदन सादर

मुंबई दि.२५ :- महाराष्ट्रातील मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर असून अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर संबंधित अधिकारी, मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले. जळगाव येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त मंदिरांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले होते. महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान, मुंबई येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आदी सरकारीकरण झालेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू असून त्याची शासनाकडून चौकशी चालू आहे, तसेच ज्या ज्या मंदिरांवर प्रशासक वा न्यायाधीश यांची नेमणूक झालेली आहे, ती सर्व मंदिरे पुन्हा हिंदूंच्या नियंत्रणात देण्यात यावी, या संदर्भात स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

पश्चिम रेल्वेवरवर सोमवारपासून १५ डब्यांच्या सहा नवीन लोकल फेऱ्या

महाराष्ट्र सरकारने सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, राज्य सरकारने मंदिरांची संपत्ती विकास कामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी, पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या, परंतु प्रशासन, पुरातत्त्व विभाग यांकडून दुर्लक्षित मंदिरांचा तात्काळ जीर्णाेद्धार करण्यासाठी भरीव तरतूद करावी; राज्यातील तीर्थक्षेत्रे आणि गडकिल्ले असलेल्या मंदिरांवरील अतिक्रमण यांचे सर्वेक्षण करून ती तात्काळ हटवावित, मंदिरांच्या पुजारीवर्गाचे उत्पन्न नगण्य असल्याने सरकारने त्यांना प्रतिमाह मानधन द्यावे; मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या पावित्र्यरक्षणार्थ त्यांच्या परिसरात मद्य-मांस यांची विक्री करता येणार नाही, अशी शासनाने अधिसूचना काढावी इत्यादी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Dwadi Roda ; पाणीप्रश्नी नागरिक व महिलांची एमआयडीसी कार्यालयात धडक भेट

हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार भरतशेठ गोगावले, ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष, अधिवक्ता सुरेश कौदरे आणि महाराष्ट्रातील अन्य मंदिराचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *