तीनही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.२९ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावरसकाळी ११.५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत
ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून माटुंग्यानंतर त्या पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या गच्चीवर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू
या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि वांद्रे तसेच गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
वांद्रे पश्चिम व खार पश्चिमसह ‘एच पश्चिम’ विभागात ४ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा
मेगाब्लॉक काळात पनवेल आणि कुर्लादरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहेत. या लोकल कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून चालविण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते सांताक्रूझ आणि पाचव्या मार्गिकेवर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.