महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई दि.२९ :- येत्या १ मे अर्थातच महाराष्ट्र दिनापासून मुंबई मेट्रो प्रवासात ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-१ पासावर ही सवलत मिळणार आहे.

‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या गच्चीवर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू

यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलत देण्यात आली आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी अपंगांसाठी ही सवलत असून या सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. ही सवलत मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्थानकांवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकेल.

वांद्रे पश्चिम व खार पश्चिमसह ‘एच पश्चिम’ विभागात ४ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा

नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-१ कार्डवरही सवलत असेल तसेच याला ३० दिवसांची वैधता राहील. मुंबई १ कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.