ठळक बातम्या

‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या गच्चीवर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू

दरमहा ५ हजार युनिट ऊर्जेची निर्मिती होणार

मुंबई दि.२९ :- बृहन्मुंबई महापालिका ‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या गच्चीवर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या विद्युत ऊर्जेचा वापर विभाग कार्यालयासाठी करण्यात येणार असून दरमहा साधारणपणे ५ हजार युनीट विजेची निर्मिती केली जाणार आहे‌. यामुळे दरमहा सुमारे ४२ हजार ५०० रूपयांच्‍या वीज खर्चाची बचत होणार आहे.

वांद्रे पश्चिम व खार पश्चिमसह ‘एच पश्चिम’ विभागात ४ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा

अशी माहिती ‘एम पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली. सुमारे २ हजार १०० चौरस फूट जागेत ९३ सौर ऊर्जा पॅनल (रूफ टॉप सोलर सिस्टिम) बसविण्यात आले असून हा सौर ऊर्जा प्रकल्प हा कालपासून (२८ एप्रिल) सुरू झाला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आयुर्मान हे सुमारे २५ वर्षे इतके आहे.

सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न- अधिवक्ता सुभाष झा
सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्‍यासाठी ३४ लाख ६० हजार रूपये खर्च आला असून हा खर्च पुढील सहा वर्षात वसूल होईल, असा विश्‍वास ‘एम पश्चिम’ विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील तावडे यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *