* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना ‘निवाडा’ देण्याची भूमिका टाळावी – राज्यपाल रमेश बैस – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना ‘निवाडा’ देण्याची भूमिका टाळावी – राज्यपाल रमेश बैस

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान
मुंबई दि.२३ :- प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना ‘निवाडा’ देण्याची भूमिका टाळावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. अलीकडच्या काळात राज्यात पत्रकारांवर झालेले हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असले तरी त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असेही राज्यपाल बैस यांनी सांगितले.
भारताची चंद्रयान ३ मोहिम यशस्वी – दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरविणारा भारत जगातील पहिलाच देश
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात बुधवारी प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. १९९५ नंतर देशात इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणात आली. गेल्या दशकात त्यासोबत डिजिटल व समाज माध्यमेही आली. परंतु, ही सर्व माध्यमे एकमेकांना पूरक ठरली असून माध्यम जगातील क्रांतीनंतरही वृत्तपत्रांनी आपली विश्वसनीयता टिकवून ठेवली आहे, असे राज्यपाल बैस म्हणाले.
‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ विभागात उद्या पाणी नाही
विजय वैद्य यांना देण्यात आलेला ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून तो मानवी चेहऱ्यासह पत्रकारितेच्या मोठ्या परंपरेचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला याचा अतिशय आनंद झाला, असे वैद्य यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर विष्णू सोनवणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *