सर्वोच्च न्यायालयाने लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आपण निवडणुकीला सामोरे जाऊ या- उद्धव ठाकरे
मुंबई दि.१२ :- सर्वोच्च न्यायालयाने सगळी लक्तरे वेशीला टांगल्यानंतर आपण सगळे आता निवडणुकीला सामोरे जाऊ या. लोकशाहीत शेवटचे न्यायालय जनतेचे असते. जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत आहे? आपण जनतेचा कौल स्वीकारू, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Dombivali ; शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच तीनचाकी टेम्पो चोरीला
काल न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवलाय, तो हलत नाही, डोळे उघडत नाही वगैरे सांगून तो मेलाय हे जाहीर करण्याचे काम फक्त विधानसभा अध्यक्षांकडे सोपविले आहे. विधानसभाअध्यक्ष आधी आमच्याकडे होते. आता ते भाजपमध्ये आहेत. त्यांना राजकीय प्रवासाची माहिती असून तो प्रवास कायद्याच्या चौकटीत राहून कसा करायचा हे त्यांना चांगले कळते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
विधानसभा अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतीलच. त्यांनी काही उलट-सुलट केले तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. विधानसभा अध्यक्षांनी काही वेडंवाकडे केले तर त्यानंतर जी बदनामी होईल, तेव्हा जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांनी लवकरात लवकर परत यावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घ्यावा, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात काल जे घडले, त्याकडे अनेकजण त्यांच्या चष्म्यातून बघू शकतात. मेलेला पोपट हातात घेऊन मागून मिठूमिठू करणारी लोकं आहेत. तात्पुरते जीवदान मिळाले आहे. महाराष्ट्राची ही अवहेलना थांबवायला पाहिजे. माझ्याप्रमाणेच नैतिकतेला जागून या बेकायदेशीर सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणीही ठाकरे यांनी केली.