* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, चिन्हाबाबत ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
राजकीय

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, चिन्हाबाबत ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी

मुंबई दि.२७ :- केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येत्या सहा ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह याबाबत सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यावर दावा सांगण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

‘उबाठा’ गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

पक्ष आणि चिन्ह यावर दावा सांगण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधिमंडळातील सदस्य संख्येच्या आधारे पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

राज्यातील स्काऊट गाईडसनी व्यसन मुक्तीसाठी अभियान राबवावे – राज्यपाल रमेश बैस

तर पक्ष, संघटना पातळीवर पदाधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेने केलेल्या अध्यक्ष निवडीविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील निकालाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *