ठळक बातम्या

७४६ प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित

मुंबई दि.२७ :- महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकडून (महारेरा) जानेवारी महिन्यात नोंदवलेल्या ७४६ प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रकल्पातील विकासकांना जाहिरात, विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, चिन्हाबाबत ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी

रेरा कायद्यातील तरतुदीनुसार, या ३८८ प्रकल्पांनी पहिल्या तीन महिन्यांत किती सदनिकांची नोंदणी झाली, त्यापोटी किती रक्कम जमा झाली आणि त्यापैकी किती रक्कम खर्च झाली, तसेच इमारत आराखडय़ात झालेला बदल (असल्यास) आदी तपशील संकेमात्र याची पूर्तता न केल्यामुळे या विकासकांना आधी १५ दिवसांची आणि नंतर रेरा कायद्यातील कलम ७ नुसार प्रकल्पाची नोंदणी रद्द किंवा स्थगित का करू नये, अशी विचारणा करणारी व ४५ दिवसांची मुदत देणारी नोटीस बजाविण्यात आली होती. या नोटिसीला प्रतिसाद न देणाऱ्या ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्याचा निर्णय महारेराने घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *