* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> राज्यातील स्काऊट गाईडसनी व्यसन मुक्तीसाठी अभियान राबवावे – राज्यपाल रमेश बैस – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

राज्यातील स्काऊट गाईडसनी व्यसन मुक्तीसाठी अभियान राबवावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि.१७ :- स्काऊट आणि गाईडसनी युवकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी मोठे अभियान राबवावे, तसेच प्रत्येक स्काऊट व गाईडने एकतरी वृक्षाची लागवड करावी असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केले. राज्यपाल बैस यांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे मुख्य आश्रयदाते म्हणून पदग्रहण केले. यावेळी राज्यपाल बैस बोलत होते.

माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका ; राज ठाकरे

राजभवन येथे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडचे अध्यक्ष संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पदग्रहण सोहळ्यास स्काऊट गाईडचे राज्य मुख्य आयुक्त तथा आयुक्त क्रीडा व युवक सेवा डॉ सुहास दिवसे यांनी राज्यपालांना स्काऊट गाईड प्रतिज्ञा दिली.

डॉ. सी.डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाला साजेसा वनउद्यानाचा आराखडा सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

संजय बनसोडे यांच्या हस्ते राज्यपालांना स्काऊट स्कार्फ तसेच आश्रयदाते पदक प्रदान करण्यात आले. आयुक्त डॉ सुहास दिवसे यांनी स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास सांगितला. महाराष्ट्र स्काऊटच्या राज्य चिटणीस सारिका बांगडकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *