कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्यापासून दहा प्रभाग क्षेत्रात कचरा संकलन केंद्रे
कल्याण दि.१९ :- कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्यापासून (शनिवार) १० प्रभाग क्षेत्रात कचरा संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. ही संकलन कचरा केंद्रे पाच स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहेत.
करोना काळात बृहन्मुंबई महापालिकेने केलेले काम जगात अतुलनीय – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने
प्रभागातील कर्मचारी, महिला बचत गट सदस्य, कचरा वेचक संघटना प्रतिनिधी यांचा या उपक्रमात सहभाग असेल, असे आयुक्तांनी सांगितले. २० मे ते ५ जूनपर्यंत कचरा संकलन केंद्रांवर सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत कचरा संकलित केला जाणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका प्रभाग संख्येच्या वादावर सर्वोच्च न्यायालय आता ऑगस्टमध्ये सुनावणी
नागरिकांकडून घरात वापरून झालेल्या पण पडीक असलेल्या जुनी खेळणी, दप्तरे, बूट, चप्पल, प्लास्टिकच्या वस्तू, खेळणी, वापरातील पण सुस्थितीत असलेली पुस्तके कचरा म्हणून फेकून दिली जातात. रद्दीत दिली जातात. अशा वस्तु पालिकेच्या माध्यमातून विविध संकलन केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.