गढरत्न’ आणि ‘उत्तराखंड समाज गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा

 मुंबई आसपास प्रतिनिधी

मुंबई-गढवाल भ्रातृ मण्डल, मुंबई या उत्तराखंड प्रदेशातून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या लोकांच्या संस्थेतर्फे देण्यात येणारे ‘गढरत्न’ व ‘उत्तराखंड समाज गौरव सन्मान २०२२’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे प्रदान करण्यात आले. यावेळी गढवाल भातृ मंडळाचे अध्यक्ष रमण मोहन कुकरेती, महासचिव मनोज द्विवेदी उपस्थित होते.

‘स्वातंत्र्यवीर’ प्रकाशध्वनी कार्यक्रम पुन्हा सुरू – दर शनिवार आणि रविवार रात्री आठ वाजता

उत्तराखंड आकाराने लहान राज्य असले तरीही आज उत्तराखंड येथील लोक देशविदेशात काम करीत असल्याचे नमूद करून उत्तराखंडच्या लोकांनी प्रामाणिकपणा, मनमिळावू स्वभाव आणि कठोर परिश्रम यामुळे आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

५३ व्या ‘इफ्फी’ महोत्सवात ‘इंडिया लॉकडाऊन’चा प्रिमिअर

मूळ उत्तराखंडच्या लोकांनी आपल्या गढवाली, कुमाऊंनी आणि इतर बोलीभाषांचा वापर आपापसात बोलताना करावा. भाषेशी नाळ कायम ठेवली तर त्या माध्यमातून प्रदेशाच्या इतिहास आणि संस्कृतीशी जुळून राहता येईल असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

दुर्गाडी किल्ला खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारणार

उत्तराखंड येथील गढवाल विश्वविद्यालय, श्रीनगर येथे इंग्रजीचे विभागप्रमुख असलेले डॉ दाता राम पुरोहित यांना त्यांच्या लोककला, लोकसंस्कृती आणि लोकवाद्यांच्या प्रचार प्रसार कार्यासाठी प्रतिष्ठेचा ‘गढ रत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला.

मनमोहन नौटियाल, बीरेंद्र प्रसाद बडोनी, मेजर शंभू प्रसाद मिश्रा (से.नि.), बंशीधर गैरोला, हरिश्चंद्र डबराल, बच्चीराम उनियाल, पूर्णचंद्र बलोदी, महावीर सिंह बिष्ट, डॉ श्रीधर प्रसाद थपलियाल, बाळकृष्ण नरोत्तम शर्मा, भीष्म कुकरेती,जनार्दन प्रसाद शर्मा गोदियाल, दयाराम सती आदींना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते उत्तराखंड समाज गौरव सन्मान प्रदान करण्यात आले.      राज्यपालांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा जीवन परिचय असलेल्या स्मरणिकेचे तसेच उत्तराखंड महोत्सवावर आधारित पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

नरीमन पॉइंट ते रायगड अवघ्या वीस मिनिटांत

गढवाल भ्रातृ मंडळ मुंबई ही मुंबईतील उत्तराखंडी लोकांची सर्वात जुनी संस्था १९२८ पासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.