मुंबई, ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठे प्रकल्प राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
ठाणे- मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘एमएमआरडीए’ आणि महापालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प राबविण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाणे येथे केली.
गढरत्न’ आणि ‘उत्तराखंड समाज गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा
ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नवीन खाडी पुलावरील पोलीस मुख्यालय ते कळवा चौक आणि विटावा या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
ठाणे तसेच आसपासच्या शहरातील रस्ते वाहतूक कोंडीमुक्त कसे होतील, यासाठी ‘एमएमआरडीए’ आणि महापालिका काम करीत आहेत. शहरांमध्ये मेट्रोची कामे सुरु असून ठाणे शहरात मुख्य मेट्रोसह अंतर्गत मेट्रोचा प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. मेट्रो सुरु झाल्यानंतर नागरिक वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास करतील आणि त्यामुळे रस्त्यावर फारशी वाहने येऊन कोंडी होणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दुर्गाडी किल्ला खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारणार
कोपरी रेल्वे पुलाची मार्गिकाही लवकरच सुरु केली जाणार असून विटावा आणि कोपरी पादचारी पुलाचे काम ‘एमआरडीए’ने केले आहे. हा पुलही लवकरात लवकर सुरू करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना केली.
गढरत्न’ आणि ‘उत्तराखंड समाज गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण
ठाणे- मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील वाय जंक्शन येथे ‘एमएमआरडीए’ने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
३+३ अशा दुहेरी मार्गिकेच्या या उड्डाणपुलामुळे जेएनपीटीकडून येणारी अवजड वाहतूक आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक वेगळी केली जाणार आहे. त्यामुळे जेएनपीटी आणि गुजरातच्या सीमेवरून येणार्या अवजड कंटेनरच्या वाहतुकीसाठी तसेच मुंब्रा शहरातून येणाऱ्या स्थानिक वाहतुकीमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठीही हा उड्डाणपूल उपयुक्त ठरणार आहे