‘स्वातंत्र्यवीर’ प्रकाशध्वनी कार्यक्रम पुन्हा सुरू – दर शनिवार आणि रविवार रात्री आठ वाजता
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा उपक्रम
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित ‘स्वातंत्र्यवीर’ हा भव्य प्रकाशध्वनी कार्यक्रम पावसाळ्यानंतर आता पुन्हा सुरू झाला आहे. दादर (पश्चिम) शिवाजी उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवार रात्री आठ वाजता विनामूल्य सादर केला जातो.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात ६६ फूट x ९४ फूट भिंतीवर हा कार्यक्रम दाखविला जातो. यासाठीचा प्रोजेक्टर २७ फूट उंचीवरील एका मनोऱ्यात ठेवण्यात आला आहे. १५० प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन, ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांची तर या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, मंजिरी मराठे यांनी पेलली आहे.
‘प्लॅनेट मराठी’ वर ‘सुमी’ चित्रपट प्रदर्शित होणार
नोव्हेंबर २०२२ पासून दर शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम विनामूल्य दाखविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील घटना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट उलगडून दाखविला आहे.